ग्रामपंचायत पारगांव

    २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार पारगांव (पिन कोड ४०११०२) या ग्रामपंचायतीमध्ये सुमारे ५५० ते ६५० कुटुंबे वास्तव्यास आहेत. एकूण लोकसंख्या अंदाजे २८०० ते ३००० च्या दरम्यान असून त्यामध्ये पुरुष व महिला यांचे प्रमाण जवळपास समान आहे. गावामध्ये मुख्यतः आदिवासी (वारली) तसेच कुणबी समाजातील लोक राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून भातशेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. आदिवासी समाजातील लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, तसेच बांधकाम क्षेत्रात कामगार म्हणून कार्यरत असतात. याशिवाय काही कुटुंबे कुक्कुटपालन, बकरीपालन व लहान प्रमाणात दुग्धव्यवसाय देखील करतात.
श्रावण महिन्यात, विशेषतः गणपती उत्सवाच्या अगोदरच्या काळात, जेव्हा ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू असतो, तेव्हा पावसाच्या सरींमध्ये एक विशेष नैसर्गिक भाजी रानात उगवते, तिला “अळंबी” असे म्हणतात. ही भाजी अत्यंत चवदार व पौष्टिक असते. अळंबी उगवल्यानंतर ती लगेचच तोडावी लागते, कारण काही वेळातच ती फुलून खाण्यासाठी अयोग्य होते. त्यामुळे गावातील आदिवासी बांधव पहाटे लवकर उठून रानात जाऊन अळंबी शोधतात, ती फुलण्याआधीच खुडून स्वच्छ करून ताजी बाजारात विक्रीसाठी नेतात. पावसाळ्यात हा एक महत्त्वाचा अल्पकालीन रोजगार म्हणून त्यांना उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होतो.
 

लोकसंख्येची माहिती

 
क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या
२९५०
पुरुष लोकसंख्या
१४८०
महिला लोकसंख्या
१४७०
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
३८०

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालयहोय१ होय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)नाही
उपकेंद्र (Sub Center)होय१ होय
अंगणवाडीहोय२ होय
प्राथमिक शाळाहोय१ होय
माध्यमिक शाळाहोय१ होय
उच्च माध्यमिक शाळानाही
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रनाही
समुदाय भवन (Community Hall)नाही
१०स्वस्त दर दुकान (PDS)होय१ होय
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोय१ होय
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहोय३ होय
१३सीएससी केंद्र (CSC Center)होय२ होय

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव:  

बँकेचे नाव :  

शाखेचे नाव: 

अकाउंट नंबर :  

आई एफ एस सी कोड : 

पत्ता :